Download Free Rashtirya Suraksha Din CDR | PNG | JPEG |

Download Free RAshtriya Suraksha Din CDR | PNG | JPEG |Festival Quotes in Marathi | Festival Video Templates | Coreldraw Design | Festival Free CDR | Festival Images Free Download | Festival Banner Tutorial in Coreldraw | Festival Quotes in English | Festival Post Design Free Download | Indian Festival Images Photos | Festival Template Download | Jayanti CDR | Punyatithi CDR | India Festival Messages & Wishes | Coreldraw Design Templates Free Download | Indian Festival Images Free Download | Most Popular Festival in India | Festival free PNG | Festival Design in Coreldraw | Festival Free Download CorelDraw

आपली सुरक्षा, कुटुंबाची सुरक्षा, शेजाऱ्यांची सुरक्षा, मुक्या प्राण्यांची सुरक्षा, विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणजेच आपल्या देशाची सुरक्षा. यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि सीमेवरती आम्हा सर्वांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र तैनात असणाऱ्या सैन्याविषयी आम्ही सर्व भारतीय आदरभाव आणि सन्मानाची, सुरक्षेची भावना व्यक्त करतो . जय हिंद.

गाडी चालवताना हेल्मेट घाला, वाहतूक नियमांचे पालन करा, बांधकाम करत असताना काम करत असताना अथवा निरीक्षण करत असताना सुरक्षा साधनांचा वापर करा, वजनदार वाहन चालवत असताना योग्य ती काळजी घ्या आपली सुरक्षा आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षेविषयीही काळजी घ्या . सुरक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आरोग्याची काळजी घ्या, रोज किमान ५ किलोमीटर चालण्याचा व्यायाम करा, तंबाखू तसेच मद्यसेवन करणे टाळा, खाण्यापिण्याच्या वस्तू, औषधे इत्यादी विकत घेत असताना एक्सपिरी तारीख नक्की बघा, भेसळयुक्त पदार्थाची माहिती मिळताच त्वरित अनेक माध्यमाद्वारे जनतेला माहिती द्या… आरोग्याविषयी आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करा.  आपले आरोग्य हीच देशाची सुरक्षा.. सुरक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या आजूबाजूला अनेक मुके प्राणी असतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी एक नागरिक आणि एक माणूस म्हणून आपलीच आहे. मुक्या प्राण्यांना नियमित अन्न पुरवठा करा. अपघातग्रस्त तसेच आजारी प्राणी दिसल्यास शक्य ती मदत करा. कोणी प्राण्यांना त्रास देत असेल तर त्यांना अडवा त्यांना माणुसकीच्या भावनेने समजावून सांगा. आपल्या मालकीच्या जागेत चुकून मुके प्राणी जसे कुत्रा मांजर इत्यादी विना परवानगी घुसल्यास त्यांना मारण्याऐवजी प्रेमाने वागावं. शक्य झाल्यास त्यांची पर्यायी व्यवस्था करा. मुक्या प्राण्यांची सुरक्षा हीच देशाची सुरक्षा

Download Free Rashtriya Suraksha Din CDR | JPEG |

भारतीय जनमानसामध्ये ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशाप्रती असलेली सुरक्षेची भावना, आपल्या भारतीय सैन्याबद्दल आपला असलेला अभिमान व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशाच्या सुरक्षेला प्रोत्साहन देणे आणि एक सुरक्षित समाज राखण्याचे महत्वही हा दिवस विशद करतो. या दिवशी आपण सर्वांनी भारतीय सैन्य दल, पोलिस खाते तसेच होमगार्ड आणि देशाची आणि देशातील जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी स्विकारणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे हार्दीक अभिनंद केले पाहीजे आणि सर्वांप्रती आपला आदभाव व्यक्त केला पाहीजे.

राष्टीय सुरक्षा दिवस साजरा करण्याची सुरुवात प्रथम १९७२ साली झाली होती.

NCC काय आहे ?

आपण शालेय जीवनात NCC बद्दल ऐकलेच असेल.  NCC हा भारतीय सशस्त्र दलाचा युवा विभाग आहे. नवी दिल्ली, भारत येथे चे मुख्यालय असून हे आर्मी, नेव्ही आणि वायुदल यांनी बनलेली त्रिसेवा संस्था म्हणून कार्यरत आहे. भारतामध्ये सैनिक युथ फाऊंडेशन ही एक ना-नफा संस्था असून ती हायस्कूल, महाविद्यालये आणि विद्यापिठांमधनून कॅडेटसची नोंदणी करते.
शिस्त आणि एकता ही NCC ची मुख्य उद्दिष्टे आहेत. ३ लाख शालेय मुलांना स्वेच्छेने आणि शिस्तबध्द पध्दतीने देशसेवे च्या कार्यात अग्रेसर करणारी ही एक भव्य संस्था आहे.

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची थीम

NCC कडून प्रत्येक वर्षी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आणि राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यासाठी नवीन थीम तयार केली जाते. या थीमद्वारे समाजातील विविध घटनांप्रती जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.फक्त एक दिवस नाही तर संपूर्ण वर्षभर समाजात नागरिकांना जागरुक करणे, शिक्षित करणे आणि विकासाकडे अग्रेसर करणे यावर खुप काम केले जाते. वर्ष २०२३ साठी एनसीसी कडून Nurture young minds – Develop safety culture थीम होती. यावर्षी Safety Leadership for ESG Excellence या थिमवर ४ मार्च ते १० मार्च दरम्यान एनसीसी कडून राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात येईल.

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे उद्देश्य –

  • नागरिकांच्या सामान्य आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्यांना सुरक्षतितता प्रदान करणे.
  • त्यांच्या स्वास्थ्याविषयी जागरुक करणे.
  • राहण्याच्या ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी अराजक तत्वांपासून त्यांना सुरक्षा देणे आणि त्यांच्यात सुरक्षेची भावना कायम करणे.

अशाच प्रकारच्या पोस्ट डिजाईन फ्री मध्ये डाउनलोड करण्यासाठी readydesigns.in वेबसाईट ला नियमित भेट द्या.

आपण ग्राफिक डिझाइनर असाल तर आपणही या वेबसाईट वर डिजाईन च्या फाईल विक्री करू शकता. रेजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन डिजाईन साठी आपला whatsapp ग्रुप जॉईन करा Join Group

Try Latest CDR Designs in Affordable Price

Designs Category

गृहप्रवेश

Latest Designs

Scroll to Top