Download free Ramnavami CDR ready designs

भगवान राम हे प्रत्येक भारतीय जनमानसाचे आदरस्थान का आहेत तर त्यांच्या जीवन चरित्रावरून प्रत्येक भारतीयांस तसेच प्रत्येक मनुष्यास प्रेरणा मिळते. प्रभू राम हे जरी ईश्वरी अंश असले तरी त्यांना याचे ज्ञान नव्हते. त्यांनी सामान्य मनुष्य म्हणूनच आपल्या वडिलांच्या वचनासाठी राजगादीचा त्याग केला, वनवास पत्करला, असत्याशी लढा देऊन सामान्य मनुष्य रूपात असूनही रावणासारख्या बलाढ्य शत्रूचा सहज पराभव केला. असे हे श्रीराम प्रभूचे चरित्र युगानुयुगे मनुष्यमात्रास प्रेरणा देत राहील यात शंका नाही. जय जय श्रीराम.

वडिलांच्या एका वचनासाठी राजपाट त्याग करून १४ वर्षांचा वनवास हसत स्वीकारणारे भगवान श्रीराम सदैव आमचे आदर्श राहतील.

एक आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श भाऊ, उत्तम मित्र, सयंमी राजकारणी, नम्र भक्त, उत्तम नेतृत्व, असामान्य योद्धा आणि मर्यादा पुरुषोत्तम….. भगवान श्रीराम यांनी एक असामान्य आदर्श निर्मित केला आहे. भगवान रामचंद्रजीच्या चरणी सादर नमन.

हिंदू पंचागानुसार  चैत्र शुद्ध नवमी हा अत्यंत  महत्वाचा दिवस. हा दिवस आपण भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म दिवस म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो. भगवान विष्णूंचे सातवे अवतार प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म याच तिथीला झाला होता. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. यंदा १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येईल. भगवान कृष्ण आणि प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार असले तरी त्यांची चरित्रे आपल्याला वेगळी वेगळी दिसतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री १२ वाजता झालेला आहे तर प्रभू रामलला यांचा जन्म सूर्य डोक्यावर येतो त्यावेळी म्हणजेच दुपारी १२ वाजता झाला. 

“राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! “

“चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा”

 

प्रभू रामचंद्रांच्या जन्माची कथा तर सर्वांमध्ये लोकप्रिय आहेच. दशरथ राजाला श्रावण बाळाच्या शापामुळे संतान प्राप्ती होत नसल्याने यज्ञाद्वारे भगवान विष्णूंना आवाहन केल्यानंतर भगवान विष्णू यांनी प्रसन्न होऊन दिलेल्या प्रसादातून दशरथ महाराज यांच्या तीनही राण्यांना संतान प्राप्ती झाली. त्यापैकी माता कौसल्या यांच्या पोटी भगवान राम यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. 

या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी छान छान डिझाइन्स फ्री मध्ये घेऊन आलो आहोत. डिझाइनर मित्र या डिझाइन्स च्या कोरल फाईल तसेच मोबाईल युजर या डिझाईनच्या इमेज फाईल डाउनलोड करून स्टेटस ठेऊ शकता.
आपण सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा…

” धर्म (धार्मिकता) कोणत्याही दैवी वरदानापेक्षा अधिक महत्वाचे आहे .” जो सद्गुणी आणि ज्ञानी, न्यायी आणि दयाळू आहे तोच खरा मनुष्य आहे.” “माझ्या वडिलांची आज्ञा माझे भाग्य आहे.”

Yoga Day 6 Coral Designs

Yoga Day 6 Day Coral Draw Designs All Designs in one coral Draw Files Size-

100.00
Basaveshwar Maharaj Jayanti CDR
Basaveshwar Maharaj Jayanti Free CDR

Basaveshwar Maharaj Jayanti Free CDR Software - Coral Draw not for mobile user

30.00
Ganesh Jayanti CDR

Ganesh Jayanti Open CDR file Size 10 By 10 Inches.. All Layer and text Separated

50.00
Vishwakarma jayanti CDR

Vishwakarma Jayatni Open CDR file software - Coral Draw size - 10 by 10 inches

50.00
Parashuram janmotsav CDR
Parashuram janmotsav free CDR

Parashuram janmotsav free CDR Software - Coral Draw Editable Not for mobile users

30.00

Designs Category

गृहप्रवेश

Latest Designs

Scroll to Top