Download Free Maharashtra din Greeting Designs CDR

महाराष्ट्र राज्याचा निंर्मिती दिवस म्हणून महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपले महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. प्रत्येक मराठी मांसासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी राज्यभरात तसेच देशात विविध ठिकाणी उत्साहाने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीव १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. या सर्व हुतात्म्यांचे स्मरण महाराष्ट्र दिन साजरा करून केले जाते. 

 

महाराष्ट्र दिन – इतिहास 

फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात 21 नोव्हेंबर इ.स.1956  रोजी तणावपूर्ण वातावरण होते.  राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसं प्रचंड चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाऊंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960  रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.  

106 आंदोलकांचं हौतात्म्य

स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड त्यावेळ धुमसत होती. त्यामुळे 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. परंतु,जमाव पांगला नाही. त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 106 आंदोलकांना हौतात्म्य आलं.

Designs Category

गृहप्रवेश

Latest Designs

Scroll to Top